धर्मांध मुख्याध्यापकाकडून हिंदु महिलेवर बलात्काराचा प्रयत्न
हमीरपूर (उत्तरप्रदेश) – येथील एका सरकारी शाळेचा मुख्याध्यापक फिरोजुद्दीन याने शाळेत काम करणार्या हिंदु महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी फिरोजुद्दीन याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
‘प्रिंसिपल फ़िरोज़उद्दीन ने रेप का प्रयास किया, विरोध करने पर कर्मचारियों से पिटवाया’: सरकारी स्कूल में काम करती है हिन्दू विधवा, बताया जान का खतरा#Hamirpur #Rape https://t.co/7cek7CTkDF
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 30, 2022
पीडित महिलेने पोलिसांत प्रविष्ट केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ‘‘गेल्या अनेक दिवसांपासून फिरोजुद्दीन हा माझ्यावर त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. भीतीने मी याविषयी तक्रार प्रविष्ट केली नाही. त्यामुळे त्याने त्याचा अपलाभ उठवला. तो सतत माझा विनयभंग करत होता. त्यास मी विरोध करत होते. २६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी मी फिरोजुद्दीनच्या कक्षात ठेवलेल्या ‘रजिस्टर’वर स्वाक्षरी करण्यासाठी गेले असता, त्याने आतून त्या कक्षाची कडी लावून घेतली आणि माझ्याशी बलपूर्वक शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मी कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. फिरोजुद्दीनचा परिसरात मोठा दबदबा आहे आणि त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे.’’
संपादकीय भूमिका
|