‘द कश्मीर फाइल्स’वर टीका करणारे इस्रायली दिग्दर्शक नदाव लॅपिड यांची क्षमायाचना

पणजी (गोवा) – येथील ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपाच्या वेळी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला ‘अश्‍लाघ्य’ म्हणणारे इस्रायली दिग्दर्शक नदाव लॅपिड यांच्यावर देशभरातून टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी अखेर ‘माझा उद्देश कुणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता’, असे म्हणत क्षमा मागितली आहे. लॅपिड यांनी म्हटले आहे की, मला कुणाचाही अपमान करायचा नव्हता. माझा पीडितांचा किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता. मी त्यांची क्षमा मागू इच्छितो.

(सौजन्य : India Today) 

संपादकीय भूमिका 

दोन दिवस देशभरातून, तसचे इस्रायलच्या भारतातील राजदूतांकडून विरोध झाल्यानंतर क्षमा मागणार्‍या नदाव यांच्यावर कारवाईच होणे आवश्यक आहे ! जर कुणी अशा प्रकारे विधाने करून नंतर क्षमा मागून सुटत असेल, तर तशी प्रथाच चालू होईल.  त्यामुळे अशांना शिक्षा झाली पाहिजे !