‘यू ट्यूब’ने हटवले भारतातील १७ लाख व्हिडिओ !

नवी देहली – ‘यू ट्यूब’ने जुलै ते सप्टेंबर या काळात भारतातील १७ लाख व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. यू ट्यूबवरून जगभरातील एकूण ५६ लाख व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. त्यांमधील १७ लाख व्हिडिओ भारतातील आहेत. तसेच व्हिडिओसमवेतच्या ७३ कोटी प्रतिक्रियाही हटवण्यात आल्या आहेत. व्हिडिओ हटवण्यामागे ‘समुदाय मार्गदर्शक तत्त्वां’चे उल्लंघन केल्याचे बोलले जात आहे.

यू ट्यूबने जुलै ते सप्टेंबर या काळात जवळपास ५० लाख चॅनल बंद केले आहेत. चुकीची माहिती, दिशाभूल करणारी माहिती, फसवणूक करणारे व्हिडिओ या कारणांमुळे यू ट्यूबने हे पाऊल उचलले आहे.