मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांविषयी उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला फटकारले !
२३ डिसेंबरपर्यंत समयमर्यादा !
पनवेल – मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड प्रमाणात निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या संदर्भात चिपळूण येथील अधिवक्ते ओवेस पेचकर यांनी याचिका केली आहे. या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला फटकारले आहे आणि २३ डिसेंबरपर्यंत या महामार्गावरील खड्डे बुजवण्याची अंतिम समयमर्यादा दिली आहे.
या संदर्भात माहिती देतांना सांगण्यात आले की, सध्या पनवेल ते खारघर या भागांतून जाणार्या महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येत आहेत आणि दुसर्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या भागांतील खड्डे बुजवण्यात येतील.