मनसे मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार ! – राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
कोल्हापूर – मी महाराष्ट्र आणि माझ्या राजकीय पक्षासाठी काम करतो. पक्षाच्या बळकटीकरणासाठी विभागनिहाय दौरे चालू आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार आहे, अशी माहिती अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.
राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘मनसे प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याची रणनीती ठरवत आहे. वर्ष १९९५ मध्ये आणि १९९९ मध्ये मनसेने अनेकांचे बालेकिल्ले हालवले होते. महाराष्ट्राचे मूळ प्रश्न चव्हाट्यावर येऊ नयेत, सत्ताधार्यांना प्रश्न विचारू नयेत म्हणून सीमा प्रश्नाचा विषय उकरून काढला जात आहे. राज्यपाल कोश्यारीही यासाठीच वक्तव्य करतात का ? याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे. आताच सीमाप्रश्न उकरून काढणारे आणि कोश्यारी यांना कोणीतरी ‘स्क्रिप्ट’ देत असतील आणि त्यावरून ते बोलत असतील.’’