आनंदी जीवन जगण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – शशांक मुळे, सनातन संस्था
भोर येथील ‘सुभाष इंजिनीयरिंग वर्क्स’ या आस्थापनात ‘आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन
भोर (जिल्हा पुणे) – सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आनंद शोधत असतो, तो मिळवून आनंदी जीवन जगायचे असेल, तर प्रत्येकाने साधना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. शशांक मुळे यांनी केले. भोर येथील ‘सुभाष इंजिनीयरिंग वर्क्स’चे श्री. सत्येन चवरे आणि सौ. ईशा चवरे यांनी आस्थापनामधील कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ‘गोसंवर्धन’ या विषयावरही मार्गदर्शन करण्यात आले.
वैशिष्ट्यपूर्ण : सौ. ईशा चवरे यांनी ‘आस्थापनामध्ये येथून पुढे साधनेतील विविध विषयांवर प्रवचन आणि मुलींसाठी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम’ घेऊया’, असे सांगितले.