पालेभाज्या काढणीस आल्यावर मुळासकट उपटू नयेत !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘हिवाळ्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची लागवड करू शकतो. पालेभाज्या साधारणपणे एक ते सव्वा मासात काढणीला येतात. पालेभाज्या काढतांना मुळासकट न उपटता त्यांची केवळ पाने हाताने खुडून किंवा कात्रीने कापून घ्यावीत. असे केल्याने त्या रोपांना पुन्हा नवे फुटवे (कोंब) येतात आणि एकदा केलेल्या पेरणीतून २ – ३ वेळा पालेभाजी मिळू शकते.
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२५.११.२०२२)