महाकाल सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने वीरयोद्धा लाचित बोरफुकनजी यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन
होजाई (आसाम) – पूर्वाेत्तर भारतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाणारे वीरयोद्धा लाचित बोरफुकनजी यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त महाकाल सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तपणे एका ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठ श्री. नभोनिलकर, महाकाल सेना; होजाईचे संस्थापक श्री. मिथुन रॉय, सीता आश्रमाच्या संस्थापिका सौ. गीत कामरूपा आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमंत देबनाथ यांनी या कार्यक्रमात विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला झारखंड, बंगाल आणि मेघालय येथील अनेक धर्माभिमानी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कनक भारद्वाज यांनी केले.
१. श्री. नभोनिलकर – महान योद्धा लाचित बोरफुकनजी यांच्या जीवनातून अनेक गोष्टी शिकू शकतो. त्यांनी शारीरिक कष्ट सहन करून राष्ट्रासाठी समर्पित भावाने त्याग केला. असा त्याग आपणही करू शकतो.
२. श्री. मिथुन रॉय – लाचितजी यांचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. त्यांच्याविषयी माहिती असलेला धडा मुलांच्या शालेय अभ्यासक्रमात शिकला गेला पाहिजे.
३. सौ. गीत कामरूपा – लाचित यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधानांकडून मिळालेल्या शुभेच्छा आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. महान योद्धा लाचित यांच्या जीवन चरित्रातून संपूर्ण देशाने प्रेरणा घेतली पाहिजे.
४. श्री. सुमंतो देबनाथ – लाचित बोरफुकन यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.