संभाजीनगर येथे पोलिसांची अनुमती न घेता ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोर्चा !
भाजप पदाधिकार्यासह दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद !
संभाजीनगर – राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी २८ नोव्हेंबर या दिवशी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्ह्यातील वैजापूर तहसील कार्यालयावर ‘मूक मोर्चा’ काढण्यात आला होता. तथापि पोलिसांची अनुमती न घेताच मोर्च्याचे आयोजन केल्याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष गौरव दौडे यांच्यासह सौरव धामणे आणि स्वप्नील राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या तिघांच्या विरोधात गोपनीय शाखेचे विजय भोटकर यांनी तक्रार दिली होती.
१. ‘श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब याला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यात यावा’, या मागण्यांसाठी वैजापूर शहरात ‘मूक मोर्च्या’चे आयोजन करण्यात आले होते.
२. शहरातील महाराणा प्रताप पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील अन्य राज्यांप्रमाणेच ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा अमलात आणावा.
३. ‘लव्ह जिहाद’च्या निषेधार्थ मोर्चा काढण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी २७ नोव्हेंबर या दिवशी पोलिसांकडे अनुमती मागितली होती; मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांनी या मोर्च्याला अनुमती नाकारली होती.
४. मोर्च्याचे आयोजन करणार्या तिघांनाही नोटीस देत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन न करण्याविषयी समज दिली होती; मात्र त्यानंतरही मोर्चा काढण्यात आल्याने भाजपच्या पदाधिकार्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.