गोवर आला असल्यास पाळायचे पथ्य
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १०४
‘गोवराचा पुरळ अंगावर दिसू लागल्यास मुलाला शाळेत न पाठवता घरीच ठेवावे. शक्यतो त्याला इतरांच्या संपर्कात येऊ देऊ नये. दूध आणि दुधाचे पदार्थ टाळावेत. अल्पाहारासाठी शिरा, उपमा, घावन किंवा भाकरी, तर जेवणामध्ये वरणभात आणि तिखट अन् तेलकट नसलेली भाजी असावी. तहान लागल्यावर उकळून थंड केलेले पाणी द्यावे. हातपाय धुण्यासाठी शक्यतो कोमट पाणी द्यावे. अंघोळीचे पाणी गरम करतांना त्यामध्ये शक्य असल्यास अडुळसा किंवा कडूनिंब यांची मूठभर पाने घालावीत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०२२)