धरणगाव (जिल्हा जळगाव) येथे लव्ह जिहाद विरोधात आंदोलन !
जळगाव, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – धरणगाव येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.
आफताबसारख्या नराधमाला लवकरात लवकर फाशी व्हावी आणि लव्ह जिहाद बंदी कायदा महाराष्ट्रात तात्काळ लागू व्हावा, अशी मागणी या वेळी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. आंदोलकांच्या भावना समजून घेत तहसीलदारांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन निवेदन स्वीकारले.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल आदी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनाला उपस्थित होते. धरणगाव भाजपने या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. ५०० हून अधिक धर्मप्रेमी नागरिकांनी निवेदनावर स्वाक्षर्या करून निषेध नोंदवला.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रवीण पाटील, भाजप युवा मोर्चाचे धरणगाव तालुका उपाध्यक्ष श्री. दीपक महाजन, रणरागिणी शाखेच्या कु. सायली पाटील, अधिवक्ता संजय महाजन, भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्री. कैलास माळी सर, भाजप गटनेते अधिवक्ता संदीप पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
अन्य उपस्थित मान्यवर
ह.भ.प. मधुकर महाराज पष्टानेकर, भाजपचे नगरसेवक श्री. भालचंद्र माळी, भाजपचे ओबीसी सेल तालुका अध्यक्ष श्री. सुनील चौधरी, भाजपचे धरणगाव सरचिटणीस श्री. कन्हैय्या रायपूरकर, भाजपचे शहर अध्यक्ष श्री. दिलीप महाजन, तसेच श्री. कांतीलाल माळी आणि अधिवक्ता हर्षल चव्हाण