पिंपरी (पुणे) येथील दूषित शालेय पोषण आहार देणार्या संस्थेला पाठीशी घालणार्या उपायुक्तांना निलंबित करा ! – रमेश वाघेरे, माहिती अधिकार कार्यकर्ते
पिंपरी (जिल्हा पुणे) – ‘सावित्री महिला स्वयंरोजगार संस्थे’कडून पुरवला जाणार्या शालेय पोषण आहारामध्ये अळ्या, काचेचे तुकडे, प्लास्टिकचे तुकडे आणि केस आढळून आले आहेत, तसेच याच संस्थेच्या विरोधात ७ शाळांच्या मुख्याध्यापकांनी अनेकवेळा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. तरीही खोत यांनी या संस्थेविरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केला आहे. (शालेय पोषण आहारासारख्या संवेदनशील विषयामध्ये अधिकार्यांची अशी असंवेदनशीलता असेल, तर अन्य वेळी हे अधिकारी कसे काम करत असतील ? वारंवार तक्रारी करूनही स्वयंरोजगार संस्थेच्या विरुद्ध कारवाई न करणार्यांवरही आता कारवाई करायला हवी ! – संपादक)
या संस्थेच्या शालेय पोषण आहाराविषयी २५ ऑगस्ट या दिवशी पहिली तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर वारंवार पोषण आहाराविषयी तक्रारी केल्या जात होत्या. तरीही शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, यावरून शिक्षण विभागाच्या उपायुक्तांनी या संस्थेला पाठीशी घातल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे अशा कामचुकार अधिकार्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी वाघेरे यांनी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संपादकीय भूमिका
|