देहलीतील भाजपच्या नेत्याकडून पुजार्यांना पगार देण्याची आप सरकारकडे मागणी
नवी देहली – दिल्ली महानगरपालिकेच्या (एम्.सी.डी.च्या) निवडणुकीत मशिदींचे इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख) आणि मुएझिन (मशिदीमध्ये अजान देऊन लोकांना नमाजसाठी बोलावणारी व्यक्ती) यांना पगार देणे, हे प्रचाराचे प्रमुख सूत्र बनले आहे. यावरून भाजपने राज्यातील मंदिरांतील पुजारी आणि गुरुद्वारांचे ग्रंथी (गुरुद्वाराचे प्रमुख) यांना इमाम आणि मुएझिन यांच्याप्रमाणेच मासिक वेतन देण्याची मागणी केली आहे. भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांनी यासंदर्भात केजरीवाल यांना औपचारिक पत्र लिहिले आहे.
प्रवेश वर्मा यांनी लिहिले आहे की, कराचा पैसा समाजातील कोणत्याही एका धार्मिक वर्गावर खर्च करू नये, ही धर्मनिरपेक्षतेची मागणी आहे. त्यावर सर्व धर्मीय वर्गाचा समान हक्क आहे. देहलीतील आम आदमी पक्षाचे सरकार हिंदूंशी भेदभाव करते. मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वारांच्या ग्रंथी यांनाही इमाम आणि मुएझिन यांच्याप्रमाणे पगार मिळायला हवा.