अक्कलकोटमधील २८ गावे कर्नाटकात जाण्यास इच्छुक ?
अक्कलकोट – सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यातील २८ गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूल सुविधा मिळत नाही. यामुळे संतप्त झालेल्या या गावांमधील ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामस्थांनी ‘आम्हाला एस्.टी., आरोग्य अशा सुविधाही मिळत नाही. मग आम्ही कर्नाटकात का जाऊ नये ?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात चालू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांचा जयघोष केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूर आणि अक्कलकोट येथील काही गावांवर दावा सांगितला होता.