अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाने समलैंगिक विवाह विधेयक केले संमत !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाने समलैंगिक विवाहाचे विधेयक संमत केले आहे. आता ते प्रतिनिधी सभेकडे अंतिम संमतीसाठी पाठवले जाणार आहे. यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यावर स्वाक्षरी करतील आणि हा कायदा अस्तित्वात येईल. ही सर्व प्रक्रिया जानेवारीच्या आधी पूर्ण होईल. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होताच समलैंगिक विवाहांना मान्यता दिली जाईल. वर्ष २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेत यावर बंदी घातली होती.
US Senate passes bill protecting same-sex marriage https://t.co/aLMT6PtKEg
— Guardian US (@GuardianUS) November 29, 2022
विधेयक संमत झाल्यावर आनंद व्यक्त करतांना राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, ‘प्रेम हे प्रेम आहे’ आणि अमेरिकेत रहाणार्या प्रत्येक नागरिकाला तो ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासमवेत विवाह करण्याचा अधिकार आहे.