संभाजीनगर येथे लाच घेतांना विद्युत् साहाय्यकाला अटक !
भ्रष्टाचाराने पोखरलेला महावितरण विभाग !
संभाजीनगर – शेतात वीज पंपाच्या नवीन जोडणीसाठी ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना कन्नड तालुक्यातील औराळा वीज उपकेंद्राचे विद्युत् साहाय्यक हृषीकेश वाडेकर (वय २८ वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संभाजीनगर पथकाने २८ नोव्हेंबर या दिवशी पकडून अटक केली.
सध्या रब्बीचा हंगाम चालू असून शेतात गहूची लागवड करण्यात आली आहे, तर पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने शेतकर्यांची वीजजोडणीसाठी धडपड चालू आहे. असे असतांना हृषीकेश वाडेकर हे लाच दिल्याविना वीजजोडणी देत नसल्याने शेतकरी हतबल झाले होते. या वेळी तक्रारदार तरुणाच्या वडिलांकडेही वाडेकर याने लाच मागितली होती. त्यामुळे वाडेकर यांना धडा शिकवण्यासाठी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. वाडेकर याच्यावर झालेल्या कारवाईनंतर परिसरातील शेतकर्यांनी तक्रारदार मुलाचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.