पाण्याची पाईपलाईन फुटून पिंपरीमध्ये (पुणे) सहस्रो लिटर पाणी वाया !
पुणे – नेहरूनगर, पिंपरी येथे महापालिकेची पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे सहस्रो लिटर पाणी वाया गेले, मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना २९ नोव्हेंबर या दिवशी दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही. मागील ३ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा चालू आहे. एक दिवसआड होणार्या पुरवठ्यामुळे नागरिकांच्या तक्रारी असतांना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने सहस्रो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.
कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांनी सांगितले की, पाईपलाईनचा वॉल तुटला असून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे, तसेच २ घंट्यामध्ये दुरुस्तीचे काम पूर्ण होईल.