आमच्या भारताशी असलेल्या संबंधांमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करू नये ! – चीनची तंबी
बीजिंग (चीन) – अमेरिकेच्या अधिकार्यांनी आमच्या भारताशी असलेल्या संबंधांमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी तंबी चीनने अमेरिकेला दिली आहे.
China warns US officials ‘not to interfere in its relationship with India’, says Pentagon https://t.co/xRYSlR9ApS
— Republic (@republic) November 30, 2022
अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असणार्या ‘पेंटगॉन’ने संसदेला पाठवेल्या अहवालामध्ये चीनविषयी माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, चिनी सैन्य भारताला अमेरिकेच्या जवळ जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी चीन सीमेवरील तणाव अल्प करण्याचा प्रयत्न करत आहे.