उंदराला अमानुष पद्धतीने ठार मारल्याच्या प्रकरणी तरुणाच्या विरोधात तक्रार
पशूप्रेमीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधिताची केली १० घंटे चौकशी
बदायू (उत्तरप्रदेश) – येथे एका तरुणाने अमानुष पद्धतीने उंदराला ठार मारल्याने पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावून त्याची १० घंटे चौकशी केली. पशूप्रेमी आणि एका संस्थेचे अध्यक्ष असणारे विकेंद्र सिंह यांनी तक्रार केल्यानंतर ही चौकशी करण्यात आली.
A man has been booked for drowning a rat after tying it to a brick in Uttar Pradesh’s Budaun. He has been booked under relevant sections for killing or maiming cattle.#Crimehttps://t.co/v0oLR0HFbT
— IndiaToday (@IndiaToday) November 29, 2022
विकेंद्र सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मनोज नावाच्या तरुणाने एका उंदराच्या शेपटीला दगड बांधून त्याला नाल्यास फेकले. नंतर रस्सीच्या साहाय्याने बाहेर काढले आणि पुन्हा नाल्यात फेकले. उंदिर मरेपर्यंत तो असे करत होता. त्यामुळे त्याच्या विरोधात पशू क्रूरता कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. तसेच उंदराचे शवविच्छेदन करण्यात यावे.
संपादकीय भूमिकाउंदराला अमानुष पद्धतीने मारल्यामुळे संबंधिताच्या विरोधात तक्रार करणारे पशूप्रेमी गोवंशियांना अमानुष ठार मारणार्या धर्मांधांच्या विरोधात कधी तक्रार करत नाहीत, हे लक्षात घ्या ! |