रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात मंत्रपठण करण्याच्या आधी भावप्रयोग करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आरोग्य चांगले रहावे आणि साधकांचे त्रास दूर होऊन त्यांची साधना चांगली व्हावी’, यासाठी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्यानुसार प्रतिदिन नवग्रह मंत्रपठण करतात आणि श्रीरामरक्षास्तोत्रही म्हणतात. तेव्हा श्रीरामरक्षास्तोत्र म्हणण्यापूर्वी आणि नवग्रह मंत्रपठण करण्यापूर्वी भावप्रयोग करण्यात येतो. भावप्रयोग करतांना मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे आसन बनणे’, असा भावप्रयोग करणे
एकदा मंत्रपठण करण्यापूर्वी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या वेळेचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे आसन बनणे’, हा भावप्रयोग घेण्यात आला. तेव्हा ‘त्यांचे आसन, म्हणजे ‘मी’, असा भावप्रयोग करत असतांना माझ्या मनात विचार आला, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आसनावर बसणार आहेत, तर आसन स्वच्छ असायला हवे.’
अ. ‘मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे आसन आहे’, असा भाव ठेवून सेवा केल्यावर मला त्यांचे अस्तित्व जाणवत होते.
आ. ‘त्या माझ्या मांडीवर आसनस्थ झाल्या आहेत’, असे मला अनुभवायला येत होते. मला दिवसभरात असे ६ वेळा अनुभवायला आले.
इ. मी निर्विचार स्थिती अनुभवून मला शांत वाटत होते.
ई. असा भावप्रयोग करण्यापूर्वी माझ्या मनात नकारात्मक विचार येत असत; परंतु मी हा भावप्रयोग केल्याच्या दिवशी माझ्या मनात एकदाही नकारात्मक विचार आला नाही.
२. ‘प.पू. गुरुमाऊली यांच्या खोलीतील लादी बनायचे’, असा भावप्रयोग करणे
दुसर्या दिवशी मंत्रपठणापूर्वी ‘प.पू. गुरुमाऊलीच्या खोलीतील लादी बनायचे आहे’, असा भावप्रयोग घेण्यात आला. तेव्हा माझ्या मनात ‘गुरुमाऊली माझ्या देहावर त्यांचे चरण ठेवणार आहेत, तर माझ्यातील रज-तमाचा त्यांच्या कोमल चरणांना त्रास व्हायला नको. मी स्वच्छ आणि निर्मळ असायला हवे’, असे विचार येत होते. नंतर मी गुरुमाऊलींनाच प्रार्थना करत होते. ‘गुरुमाऊली, तुम्हीच मला स्वच्छ आणि निर्मळ बनवा.’
अ. मला दिवसभरात ४ वेळा त्यांचा चरणस्पर्श अनुभवता आला.
आ. त्या वेळी माझे ध्यान लागत होते आणि मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते.
गुरुमाऊलींच्या कृपेने मला हे अनुभवता आले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. संगीता चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |