पनवेल येथे लव्ह जिहादच्या विरोधात निषेध मोर्चा आणि आक्रोश सभा यांचे आयोजन !
पनवेल, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आफताबला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, या प्रकरणाचा जलदगती न्यायालयाच्या साहाय्याने निकाल दिला जावा, पूनावाला कुटुंबियांचे भारतीय नागरिकत्व रहित व्हावे, तसेच देशात धर्मांतर सक्तीविरोधी कायदा लागू करण्यात यावा, या मागण्यांसाठी सकल हिंदू समाज पनवेलच्या वतीने निषेध मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. बस स्थानकासमोरील विसावा हॉटेलपासून निषेध मोर्च्याला आरंभ होऊन त्याचे आक्रोश सभेत रूपांतर झाले. या वेळी मोर्च्यात सहभागी मान्यवर हिंदुत्वनिष्ठ, वारकरी संप्रदाय, सामाजिक कार्यकर्ते, विधीज्ञ, व्यापारी यांनी आपले विचार व्यक्त केले. मोर्च्याचा समारोप ‘वंदे मातरम्’ गीताने करण्यात आला.
क्षणचित्र – पनवेल येथील सामाजिक कार्यकर्त्या कु. अनिशा म्हात्रे यांनी हत्या प्रकरणातील हिंदु तरुणीचे मनोगत व्यक्त केले.