कब्रस्तानच्या विरोधात ग्रामस्थांचा मोर्चा !
अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या शेजारी कब्रस्तान बनवण्याचे प्रकरण !
ठाणे, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या शेजारी मुसलमानांचे कब्रस्तान बनवण्याचा महानगरपालिका आणि काही सामाजिक संस्था यांचा घाट असून त्याला अंबरनाथ येथील गावकर्यांचा विरोध आहे. हे कब्रस्तान हटवण्यासाठी ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ नागरिक २९ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता सहस्रोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले.
(सौजन्य : Zee 24 Taas)
अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या ठिकाणाहून मोर्च्याला प्रारंभ झाला. उल्हासनगर महानगरपालिकेपर्यंत मोर्चा काढून ग्रामस्थांनी कब्रस्थानला विरोध केला. ‘दफनभूमी हटवा, प्राचीन शिवमंदिर, विसर्जन घाट आणि वालधुनी नदी यांचे पावित्र्य अन् अस्मिता टिकवण्यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ नागरिकांनी एकत्र या’, असे आवाहन करत ग्रामस्थ अन् हिंदुत्वनिष्ठ नागरिक ध्वज घेऊन मोर्च्यात सहभागी झाले होते.