चंद्रपूर येथे मुलींची छेड काढल्याच्या आरोपाखाली सरपंचाला मारहाण !
चंद्रपूर – बहिणीची छेड काढल्याच्या आरोपावरून जिल्ह्यातील हिवरा गावाचे सरपंच नीलेश पुलगमकर यांना मुलीच्या भावांनी मारहाण केली. पुलगमकर हे भाजपचे पदाधिकारी आहेत. ‘माझ्यावर राजकीय वैमनस्यातून आक्रमण करण्यात आले आहे. माझ्यावर खोटा आरोप लावण्यात आला आहे’, असे नीलेश यांनी म्हटले आहे.