दळणवळण बंदीचा स्वतःच्या साधनेसाठी लाभ करून घेणारा ५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा भाग्यनगर, तेलंगाणा येथील कु. हेरंब पराग आचार्य (वय १८ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. हेरंब पराग आचार्य हा या पिढीतील आहे !
‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. हेरंब पराग आचार्य उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून तो ५५ टक्के पातळीचा आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये त्याची पातळी ५९ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१९.१०.२०२२) |
कार्तिक शुक्ल त्रयोदशी (६.११.२०२२) या दिवशी भाग्यनगर, तेलंगाणा येथील कु. हेरंब पराग आचार्य याचा १८ वा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्याची आई सौ. श्रुती पराग आचार्य यांना जाणवलेली हेरंबची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. प्रेमभावाने इतरांना साहाय्य करणे
‘कुणी दुःखी असेल, तर हेरंब अतिशय प्रेमाने त्या व्यक्तीची विचारपूस करतो. कधी मला आध्यात्मिक कारणांमुळे काही त्रास होत असेल, तर तो हातातील कामे बाजूला ठेवून आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यासाठी मला साहाय्य करतो. त्याची तळमळ आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय यांमुळे माझ्या त्रासाची तीव्रता झपाट्याने न्यून होते.
२. व्यायामाचे महत्त्व कळल्यापासून हेरंब प्रतिदिन १२ सूर्यनमस्कार घालतो, तसेच प्राणायामही करतो.
३. साधनेची तळमळ
कोरोनाच्या काळात दळणवळण बंदीमुळे हेरंब घरीच होता. त्या वेळी त्याचे प्रयत्न मला जवळून अनुभवता आले. या काळात त्याची साधनेची तळमळ पुष्कळ वाढली होती. तो साधनेच्या प्रयत्नांत सवलत घ्यायचा नाही.
अ. हेरंब देवपूजा अतिशय भावपूर्ण रीतीने करत असे.
आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ घेऊन त्यातील ओळ न् ओळ वाचत असे.
इ. तो प्रत्येक गुरुवारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ घेत असलेला भावसत्संग ऐकतो आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करतो.
ई. तो स्वतःकडून लहानशी चूक झाली, तरी दुसर्यांची क्षमा मागून प्रायश्चित्त घेतो.
उ. अभ्यास करतांना तो प्रार्थना करतो आणि उदबत्ती लावतो. कितीही अभ्यास असला, तरी तो रात्री ९.३० वाजता समष्टीसाठी नामजप करतो.
ऊ. घरातील झाडांना पाणी घालतांना तो झाडांशी बोलून त्यांना नामजप करण्यास सांगतो. बरेचदा झाडेही आनंदाने डोलून त्याला प्रतिसाद देतात. व्यवहारातील किंवा साधनेतील अडचणी, तसेच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया यांविषयी त्याच्याशी चर्चा केल्यास मला लवकर उत्तरे मिळतात.
कोरानामुळे कु. हेरंबचे १० वीचे पूर्ण वर्षभर ‘ऑनलाईन क्लासेस’ चालू होते. गुरुकृपेने १० वीच्या परीक्षेत त्याला ९७.४० टक्के गुण मिळाले. एकंदरीतच हे पूर्ण वर्ष हेरंबचा उत्तम अभ्यास होण्यास, तसेच त्याची अंतरंग साधना होण्यास ईश्वरकृपेने लाभदायक ठरले.’
– सौ. श्रुती पराग आचार्य (कु. हेरंबची आई), भाग्यनगर, तेलंगाणा. (५.८.२०२१)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |