काँग्रेसचे बालीश राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आरोप करण्याचा काय अधिकार ?
काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी स्वतःच्या पूर्वजांच्या इतिहासाचा अभ्यास केला नाही. त्यांच्यामुळे देशाची किती मोठी हानी झाली, फाळणीला उत्तरदायी कोण ? स्वतःच्या पूर्वजांनी किती दिवस आणि किती राजेशाहीत कारावास भोगला ? स्वतःच्या (काँग्रेस) पक्षातील किती लोकांनी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलीदान दिले ? या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून या बालीश राहुल यांनी क्रांतीसूर्य आणि भगूरपुत्र (नाशिक) स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यावर आरोप करायला हवे होते.
देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !
१. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी घराची राखरांगोळी करणारी एकच व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर !
२. कारागृहात कठोर शिक्षा भोगत असतांना कैद्यांना साक्षर करणारी एकच व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर !
३. जगाच्या इतिहासात दोन जन्मठेपेची शिक्षा झालेली एकमेव व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर !
४. परदेशी कपड्यांची होळी करून स्वदेशीचा वापर करण्याचा आवाहन करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर !
राहुल गांधी यांनी सांगावे की, आपल्या कोणत्या पूर्वजांनी यातील एकतरी काम केले आहे का ? आपल्याला (राहुल यांना) अधिकार नाही, या महान व्यक्तीवर आरोप करायची. आपण आत्मपरीक्षण करावे आणि राजकारणातून संन्यास घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान येथील ज्या काळकोठडीत शिक्षा भोगली, त्या ठिकाणी जावे. तेथे जाऊन १ घंटा ध्यानस्थ होऊन सावरकर आठवावे. तेव्हा समजेल की, स्वातंत्र्यवीर सावरकर किती महान होते !
– श्री. मनोज बंडोपंत कुवर, भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह, भगूर, जिल्हा नाशिक (१७.११.२०२२)