छत्रपती शिवाजी महाराज यांची महानता !
‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा उदय होण्यापूर्वी संपूर्ण हिंदु समाज मृतवत् होता. भारतातील कोणत्याही भागात लोकांच्या जीवनावर ते ‘हिंदु’ असल्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. सर्व हिंदूंचा आत्मसन्मान लुप्त झाला होता. हिंदु विरांना परकीय मुसलमान शासकांची नोकरी करण्यात धन्यता वाटत असे. नेतृत्वहीन हिंदु समाज चहूबाजूंनी आणि खोलवर निराशेच्या अंधकारात घेरला होता. अशा कठीण परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी लोकांना संघटित करून त्यांच्यामधील नष्ट झालेला आत्मविश्वास जागृत केला. हिंदु समाजात शौर्य जागृती करून आतंकवाद्यांच्या अत्याचारांचा बिमोड करण्यासाठी समाजामध्ये विश्वास निर्माण केला.’
(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’, फेब्रुवारी २०२१)