लाच घेतल्याप्रकरणी नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलीस निरीक्षकासह तिच्या पतीला अटक !
नांदेड – येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना ६० सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी २८ नोव्हेंबर या दिवशी अटक करण्यात आली. या दोघांना न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. जिल्ह्यातील कंधार येथील एका सेतू सुविधा केंद्राच्या तक्रारीची कारवाई टाळण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती. (लाच घेणार्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने सिद्ध केलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक लाच घेत असतील, तर ही लज्जास्पद गोष्ट आहे. अशा भ्रष्ट अधिकार्यांची संपूर्ण मालमत्ता जप्त करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे, असेच जनतेला वाटते ! – संपादक)
तक्रारदाराच्या नातेवाइकाविषयी या विभागाकडे चौकशी अर्ज प्रलंबित होता. ही कारवाई टाळण्यासाठी उदगीर येथील दोघेजण मीना बकाल यांच्याकडे गेले असता बकाल यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ७० सहस्र रुपये देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार २० नोव्हेंबरला सापळा रचून बकाल आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिका
|