मुसलमानांच्या विवाहामध्ये नृत्य-संगीत आणि फटाके फोडणे यांवर बंदी !
झारखंडमध्ये मौलवींचा (इस्लामच्या धार्मिक नेत्याचा) फतवा
धनबाद (झारखंड) – झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील निरसा तालुक्यातील सिबिलीबारी येथील जामा मशिदीचे प्रमुख मौलाना मसूद अख्तर यांनी मुसलमानांच्या विवाहाच्या संदर्भात फतवा काढला आहे. त्यांनी मुसलमानांच्या विवाहामध्ये नृत्य करणे, संगीत वाजवणे आणि फटाके फोडणे गैर-इस्लामी असल्याने असले प्रकार होता कामा नयेत. या नियमाचे उल्लंघन करणार्यांना दंड आकारण्याची चेतावणीही देण्यात आली आहे.
Jharkhand: Clerics ban dance, music, and fireworks in Muslim weddings, call weddings after 11 pm wronghttps://t.co/c8Pu3GKCvo
— OpIndia.com (@OpIndia_com) November 29, 2022
अख्तर यांनी २८ नोव्हेंबर २०२२ या दिवशी हा आदेश जारी केला आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही सर्वानुमते ठरवले आहे की इस्लाम धर्मानुसार विवाह होईल. यामध्ये नृत्य, डीजे संगीत आणि फटाक्यांची आतषबाजी होणार नाही. एवढेच नाही, तर आदेशाचे उल्लंघन करणार्यांना ५ सहस्र १०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. २ डिसेंबर२०२२ पासून हे निर्बंध लागू होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
संपादकीय भूमिकासध्या बर्याच ठिकाणी हिंदूंमध्ये होणारा विवाह सोहळा, हे धार्मिक विधी न रहाता, मनोरंजनाचे कार्यक्रम वाटतो. त्यामुळे वधू-वर आणि अन्य कुटुंबीय यांना त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होत नाही. विवाहाविषयी हिंदूंना धार्मिक दृष्टीकोन देण्यासाठी हिंदूंचे धर्माधिकारी पुढे येतील का ? |