पाकिस्तानातून भारतात घुसलेल्या ड्रोनला सैनिकांनी पाडले !
अमृतसर (पंजाब) – येथील चहरपूर गावात सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी २८ नोव्हेंबरच्या रात्री पाकिस्तानातून भारतामध्ये घुसलेल्या एका ड्रोनवर गोळीबार करत ते पाडलेे. हे ड्रोन आणि ड्रोनला बांधण्यात आलेल्या पांढर्या प्लास्टिक बॅगमधून काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. पाककडून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये अमली पदार्थ पाठवण्यात येत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
#BSF shoots down another #Pakistan drone along International Border in #Amritsar
For more videos, click here https://t.co/6ddeGFqedQ pic.twitter.com/zyzny4Zzqv
— DNA (@dna) November 29, 2022
संपादकीय भूमिकाअसे एक एक ड्रोन पाडत बसण्यापेक्षा ते भारतात पाठवणार्या पाकलाच धडा शिकवल्यास ही समस्या कायमची सुटेल ! |