सनातनचे ७५ वे संत पू. (डॉ.) भगवंतकुमार मेनराय (वय ८४ वर्षे) यांच्या पेसमेकर मशीनचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘पू. (डॉ.) भगवंतकुमार मेनरायकाका यांची कन्या कु. संगीता मेनराय यांनी मला एक वस्तू दाखवली आणि नंतर ती माझ्या हातात दिली. ही वस्तू पाहून आणि हातात घेऊन मला सूक्ष्म स्तरावर पुढील सूत्रे जाणवली.
१. २.११.२०२२ या दिवशी वस्तू पाहून जाणवलेली सूत्रे
अ. वस्तूला पाहून माझ्या मनाला प्रसन्न वाटले.
आ. वस्तूच्या आतमध्ये भक्तीचे निळसर रंगाचे वलय कार्यरत असल्याचे जाणवले.
इ. वस्तूकडून चैतन्यदायी शीतल लहरी माझ्याकडे येतांना मला जाणवल्या.
२. २.११.२०२२ या दिवशी वस्तू हातात घेऊन
अ. वस्तू हातात घेतल्यावर त्यातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे माझ्या भोवतीचे त्रासदायक काळे आवरण दूर झाले आणि माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन मला बरे वाटले. तेव्हा या वस्तूमध्ये आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्याचे सामर्थ्य असल्याचे जाणवले.
आ. माझा ‘ॐ’ आणि ‘श्री गुरवे नम: ।’ हे नामजप चालू झाले.
इ. माझा सच्चिदांनद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतीचा कृतज्ञताभाव जागृत झाला.
ई. ही वस्तू एका संतांची असल्याचे जाणवले.
३. २.११.२०२२ या दिवशी वस्तूच्या सूक्ष्म परीक्षणाचे चिंतन करतांना जाणवलेली सूत्रे
अ. ‘ही वस्तू सनातनचे संत पू. भगवंतकुमार मेनराय यांची असून तो त्यांचा जुना पेसमेकर (हृदयाला कार्यरत ठेवणारे यंत्र) आहे’, असा विचार माझ्या मनात आला.
आ. वरील विचार मनात येताच माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन माझ्या हृदयात आणि आज्ञाचक्राच्या ठिकाणी मला चांगल्या संवेदना जाणवून आनंदाची अनुभूती आली.
प्रयोगाचे उत्तर
‘ही वस्तू सनातनचे संत पू. भगवंतकुमार मेनराय यांची असून तो त्यांचा जुना पेसमेकर आहे’, असे मला त्यांची कन्या कु. संगीता मेनराय यांनी ३.११.२०२२ या दिवशी म्हणजे दुसर्या दिवशी सांगितले.
कृतज्ञता
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे वरील प्रयोगाचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा माझ्याकडून झाली’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.११.२०२२)
|