५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रत्नागिरी येथील कु. दुर्गा सुहास नलावडे (वय १७ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. दुर्गा सुहास नलावडे ही या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१५ मध्ये ‘कु. दुर्गा सुहास नलावडे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’ , असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ५५ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१५.१०.२०२२) |
१. धर्माचरणाची आवड
अ. ‘दुर्गा नियमितपणे कपाळावर कुंकू लावते.
आ. ती गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिमगोत्सव इत्यादी सणांच्या वेळी कुलाचारांचे मनोभावे पालन करते.
२. गायींविषयी प्रेम
दुर्गाच्या मनात गायींविषयी आदरभाव आहे. मार्गावर फिरणार्या गायी ‘प्लास्टिक’ खातील; म्हणून ती प्लास्टिकच्या पिशव्या किंवा कागद मार्गात टाकत नाही.
३. सनातनच्या ग्रंथांचे वाचन करणे आणि त्यातील माहिती इतरांना सांगणे
ती सनातनचे ग्रंथ वाचते आणि त्यातील माहिती नातेवाईक, तसेच अन्य व्यक्ती यांना सांगते. दुर्गा ग्रंथांत दिलेली ‘नैसर्गिक आपत्ती आणि संभाव्य तिसरे महायुद्ध’ यांविषयीची माहिती इतरांना सांगून त्यांना आपत्काळाची सिद्धता करण्यास सांगते.
तिने ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’ या सनातनच्या ग्रंथातील माहिती नातेवाइकांना सांगितली. दुर्गाने सांगितल्याप्रमाणे तिच्या मावशीने हा ग्रंथ वाचून सिद्धता केली.
४. स्वतःला पालटण्याची तळमळ
अ. ती आळशीपणा घालवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे.
आ. समोरची व्यक्ती मनाविरुद्ध बोलत असल्यास तिच्याविषयी मनात प्रतिक्रिया येऊ नये, यासाठी दुर्गा नामस्मरण करते. तिला त्या वेळी शांत रहाता येते.
५. देवतांप्रती भाव
कुणी देवतांचे विडंबन करत असल्याचे दुर्गाच्या लक्षात आल्यास दुर्गा त्यांना ‘तसे करू नये’, असे सांगते. ती त्यांना ‘देवतांचे विडंबन कशा प्रकारे होते ?’, हेही समजावून सांगते.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
अ. दुर्गाच्या मनात श्री गणपति आणि परात्पर गुरुदेव यांच्याप्रती अपार भाव आहे. ‘प.पू. डॉक्टर साक्षात् ईश्वर आहेत’, असा तिचा भाव आहे. ती महाविद्यालयात किंवा घराबाहेर जातांना, तसेच रात्री झोपण्यापूर्वी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करते.
आ. ती दहावीच्या शालांत परीक्षेला जातांना देवाला आणि परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करत असे. त्यामुळे तिला दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळाले. तिला संस्कृत विषयात ९९ गुण मिळाले.’
– अधिवक्त्या (सौ.) मेघना सुहास नलावडे (कु. दुर्गाची आई), रत्नागिरी (८.५.२०२२)