रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘३.५.२०२१ या दिवशी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वैकुंठरूपी आश्रमात (रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात) जाण्याची संधी त्यांच्याच कृपेमुळे मिळाली. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘आश्रमातील चैतन्यात पुष्कळ प्रमाणात वृद्धी झाली आहे.
२. ‘श्री सिद्धिविनायकाची मूर्ती पुष्कळ चैतन्यदायी आणि शक्तीदायी असून ती मूर्ती साधकांचे रक्षण करत आहे’, असे मला जाणवले.
३. श्री भवानीमातेची मूर्ती सजीव भासणे आणि तिच्यामुळे मोक्षगुरु भेटले, याबद्दल कृतज्ञता वाटणे : मला श्री भवानीमातेची मूर्ती फारच सजीव भासली. मला तिच्याकडून चैतन्य आणि शक्ती प्रक्षेपित होतांना जाणवली. श्री भवानीदेवी आमची कुलदेवता आहे आणि ‘तिनेच मला या साधनेच्या मार्गावर आणले आहे’, असे वाटून मला तिच्याविषयी प्रेम आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली. तिच्यामुळेच माझ्या जीवनात परात्पर गुरुमाऊली मोक्षगुरु म्हणून लाभली, याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. रंजना राम वैद्य, ढवळी, फोंडा, गोवा. (१८.५.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |