हिंदु जनजागृती समितीद्वारे ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट !
आळंदी (जिल्हा पुणे) – आळंदी येथे २१ नोव्हेंबर या दिवशी १६ वे भव्य वारकरी महाअधिवेशन पार पडले. यानंतर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी परभणी येथील ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर यांची भेट घेतली. या वेळी श्री. घनवट यांनी ह.भ.प. दस्तापूरकर यांना समिती करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्याविषयीची माहिती देऊन त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी समितीच्या वतीने ह.भ.प. दस्तापूरकर महाराजांना ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. या वेळी रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर, समितीचे पुणे समन्वयक श्री. पराग गोखले, श्री. विनीत पाटील आदी उपस्थित होते.