अहोभाग्य भगवंता ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘८.११.२०२२ या दिवशी मला प.पू. डॉक्टरांची पुष्कळ आठवण येत होती. विविध प्रसंगी त्यांनी माझ्यावर केलेली कृपा आठवून मनात कृतज्ञता वाटत होती. तेव्हा मला त्यांची स्तुती करावीशी वाटत होती. त्या वेळी त्यांच्याच कृपेने मला पुढील ओळी सूचल्या. त्या गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे.’
अहोभाग्य भगवंता । तव दर्शने आनंदिता ।।
जीव विसरे दैन्यता । आत्म्यास लाभे संतुष्टता ।। १ ।।
तव स्तवन करण्या । असे शब्दां अपूर्णता ।।
स्पर्शिता आमुच्या जीवना । मुक्त करिसी कर्मबंधना ।। २ ।।
वेचूनी घेसी मौक्तिके (टीप) । दाविसी तयां ब्रह्मरूपता ।
कोंदणात तयां सजविता । होई तव कृपे उपकृतता ।। ३ ।।
वात्सल्यमूर्ती दयाघना । घालविता तुम्ही दीनता ।।
जीवनी आमुच्या तिमिरत्वता । तव कृपे लाभे उषःकालता ।। ४ ।।
अंबरी भास्कर प्रदान करी तेजोमयता ।
तरी राही ग्रहां परप्रकाशित्वता ।।
तव कृपे ज्ञानसूर्य स्पर्शिता । आम्हां लाभे स्वयंप्रकाशित्वता ।। ५ ।।
कर्ते तुम्हीच या जगता । कुणास ना कळे महता ।
सद्गुरु म्हणून लाभता । लाभली जिवास प्रसन्नता ।। ६ ।।
तव चरणी कृतज्ञता । व्यक्त करण्या ।।
द्यावी मती मजला । नारायणा ।। ७ ।।
टीप – संत झालेले साधक
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.११.२०२२)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |