मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे बिलालकडून विशाल यांची हत्या !
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट !
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील ठाकूरद्वारामध्ये बिलाल नावाच्या मुसलमान व्यक्तीने विशाल वाल्मीकि उपाख्य अकोन यांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचे चित्रण सीसीटीव्हीमध्ये झाले आहे. बिलाल आणि त्याचा साथीदार दुचाकीवरून येथे आले होते आणि त्यांनी गोळ्या झाडल्यावर पळून गेले.
बिलाल ने दिन-दहाड़े दलित विशाल वाल्मीकि को मार डाला, CCTV में कैद हुई हत्या की वारदात: जाति का नाम लेकर दी गंदी-गंदी गालियाँ, 2 बच्चों के सिर से उठा पिता का साया#Moradabad #Murder #Dalithttps://t.co/VJRA7i2W15
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 27, 2022
या घटनेनंतर विशाल यांच्या नातेवाइकांनी संतप्त होऊन येथील रस्ता बंद करून आंदोलन केले. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिलालच्या अटकेसाठी पोलिसांनी ५ पथक निर्माण केले आहेत.