केरळमध्ये आदानी बंदराच्या बांधकामाला विरोध
आंदोलकांकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण : ३६ पोलीस घायाळ
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळच्या विझिंजम येथे अदानी बंदराचे काम चालू आहे. या बांधकामाला स्थानिक लोक गेल्या काही मासांपासून विरोध करत आहेत. त्यांनी विविध माध्यमांतून आंदोलन करत याला विरोध चालू ठेवला आहे; मात्र २७ नोव्हेंबरला झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या वेळी आंदोलकांनी येथील पोलीस ठाण्यावर आक्रमण केले. यात ३६ पोलीस घायाळ झाले. त्या सर्वांना स्थानिक रुग्णालयात उचारार्थ भरती करण्यात आले आहे.
Mob led by Latin Catholic Church halts construction at Vizhinjam port, attacks police station with sticks and stones, 15 priests bookedhttps://t.co/DNUYwltAh2
— OpIndia.com (@OpIndia_com) November 28, 2022
आंदोलन करणार्यांपैकी जवळपास ५० जणांविरुद्ध गुन्हे नोंदवून त्यांपैकी ५ जणांना कह्यात घेण्यात आल्याने आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले. यात ठाण्यातील महत्त्वाची कागदपत्रे नष्ट झाली, तसेच ४ जीप आणि २० दुचाकी यांची हानी झाली. आंदोलकांनी लाठ्या आणि दगड यांद्वारे पोलिसांवर आक्रमण केले. सध्या या परिसरात तणावाचे वातावरण आहे. या भागात २०० अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
‘लॅटिन कॅथॉलिक डायोसीज’ या चर्चसंस्थेच्या माध्यमांतून केले जात आहे आंदोलन !आर्चबिशप थॉमस जे नेट्टो, तसचे अन्य पाद्रयांविरुद्ध गुन्हे नोंद ! चर्चसंस्था आणि पाद्री हिंसाचाराला प्रोत्साहन देतात, हे लक्षात घ्या ! एरव्ही हिंदूंच्या संतांवर टीका करणारे पुरो(अधो)गामी आणि सर्वधमसमभाववाले आता यावर काही बोलतील का ? ख्रिस्त्यांचे ‘पाद्री म्हणजे शांततेचा मूर्तीमंत पुतळा’ अशी भारतात रंगवलेली प्रतिमा किती खोटी आहे, हे यापूर्वीही समोर आले आहे आणि आताही आले आहे, याविषयी कुणीच काही बोलणार नाही ! विझिंजममधील लोक अदानी बंदराचे बांधकाम थांबवण्यात यावे आणि किनारपट्टीच्या धूपचा अभ्यास करण्याची मागणी करत आहेत. यामध्ये स्थानिक रहिवासी, मासेमार आणि ‘लॅटिन कॅथॉलिक डायोसीज’चे सदस्य यांचा समावेश आहे. १२० दिवसांपासून चालू असलेल्या या आंदोलनात मध्यंतरी हिंसाचारही झाला. यासाठी विझिंजम पोलिसांनी लॅटिन आर्च बिशप थॉमस जे नेट्टो आणि इतर धर्मगुरु यांच्यासह ५० आंदोलकांविरुद्ध गुन्हा नोंदवला. |