बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये हिंसाचार !
फुटबॉल विश्वचषकातील सामन्यात मोरोक्कोकडून बेल्जियमचा पराभव
ब्रसेल्स (बेल्जियम) – कतारमध्ये चालू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील मोरोक्को आणि बेल्जियम यांच्यातील सामन्यात मोरोक्कोने बेल्जियमचा पराभव केल्यानंतर बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे हिंसाचार झाला. पराभवामुळे संतप्त झालेल्या फुटबॉलप्रेमींनी येथे वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच पाण्याचा मारा केला. या हिंसाचाराच्या प्रकरणात १२ जणांना कह्यात घेण्यात आले आहे.
Police had to seal off parts of Brussels, deploy water cannons and fire tear gas https://t.co/4ZrPrYAjXB
— Evening Standard (@standardnews) November 27, 2022
जगातील दुसर्या क्रमांकाचा फुटबॉल संघ, अशी बेल्जियम संघाची ओळख आहे; मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात बेल्जियम संघाला एकही गोल करता आला नाही, तर जागतिक क्रमवारीत २२ व्या क्रमांकावर असलेल्या मोरोक्कोने २ गोल केले.