५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली भुसावळ (जळगाव) येथील कु. उर्विका उमेश जोशी (वय ११ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. उर्विका जोशी ही या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले ‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी (२७.११.२०२२) या दिवशी कु. उर्विका उमेश जोशी हिचा ११ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिची आई सौ. विनया उमेश जोशी हिला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
(उर्विका म्हणजे पृथ्वी)
१. जन्मापूर्वी
‘उर्विकाच्या वेळी गर्भारपणात सर्व जण मला ‘तुझ्या चेहर्यावर पुष्कळ चैतन्य दिसत आहे’, असे म्हणायचे. तेव्हा माझी कांतीही उजळली होती.
२. जन्म
उर्विकाचा जन्म झाल्यावर तिचा चेहरा आणि तळपाय तेजस्वी दिसत होते.
३. जन्म ते ३ वर्षे
३ अ. अनुभूती – सद्गुरु नंदकुमार जाधव यांचे दर्शन झाल्यावर उर्विकाला लहानपणापासून असलेला दम्याचा त्रास आपोआप थांबणे : तिला २ वर्षांपर्यंत दम्याचा त्रास होता. पुष्कळ प्रयत्न करूनही तिला बरे वाटत नव्हते. आधुनिक वैद्यांनी आम्हाला सांगितले होते, ‘‘तिला १२ वर्षे प्रती ६ मासांनी रुग्णालयात भरती करावे लागेल.’’ त्या काळात आम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागलो आणि आम्हाला सद्गुरु नंदकुमार जाधव यांचे दर्शन झाले. सद्गुरूंच्या दर्शनानंतर आतापर्यंत तिला दम्याचा त्रास झाला नाही.
४. ४ वर्षे ते ११ वर्षे
४ अ. तिची बुद्धी प्रगल्भ आहे. ती शाळेतील सर्व शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी आहे.
४ आ. ऐकण्याची आणि शिकण्याची वृत्ती : तिला रागावले, तरी ती शांतपणे ऐकून घेते आणि ‘परत अशी चूक होऊ नये’, याची काळजी घेते.
४ इ. सतर्कता : एकदा ती आणि तिचा भाऊ शिवप्रसाद खेळत होते. तेव्हा ‘शिवप्रसादच्या पायावर ‘टिपॉय’च्या (छोट्या लाकडी पटलाच्या) वरच्या बाजूला लावलेली काच पडणार’, हे तिच्या लक्षात आले. तिने पटकन ती काच पकडली. त्यामुळे तिच्या हाताला कापले; पण तिच्या चेहर्यावर शिवप्रसादला वाचवल्याचे समाधान होते.
४ ई. साधनेची आवड
१. तिला नामजपादी उपाय करायला सांगितल्यावर ती लगेच करते.
२. ती तिच्या व्यष्टी साधनेचा आढावा देण्याचा प्रयत्न करते.
तिच्यात सहनशीलता, प्रेमभाव, इतरांची काळजी घेणे, असे अनेक गुण आहेत.
५. स्वभावदोष : आळस आणि चिडचिडेपणा.’
– सौ. विनया उमेश जोशी (कु. उर्विकाची आई), भुसावळ (जळगाव). (१६.९.२०२२)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |