पुणे येथे झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-संघटक कार्यशाळे’त ‘नामजपाचे महत्त्व’ हा विषय मांडल्यावर आणि सर्वांनी सामूहिक नामजप केल्यावर सभागृहातील प्रकाश वाढल्याचे जाणवणे
‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे येथे २ दिवसीय ‘हिंदु राष्ट्र-संघटक कार्यशाळा’ आयोजित केली होती. या कार्यशाळेला उपस्थित धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्र-संघटक होऊन धर्मप्रसाराच्या कार्यासाठी प्रतिदिन प्रयत्न करण्याचा निर्धार केला. दोन्ही दिवसांच्या सत्रात राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, तसेच साधनेचे महत्त्व आणि कृती यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. १६.४.२०२२ या दिवशी सकाळच्या सत्रात हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश जोशी आणि सनातन संस्थेच्या सौ. रश्मी नाईक (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी ‘नामजपाचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन केले. ‘नामजपाचे महत्त्व’ हा विषय झाल्यानंतर सर्वांनी काही मिनिटे सामूहिक नामजप केला. त्यानंतर सभागृहात प्रकाश वाढल्याचे सर्वांना जाणवले.’
– सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), पुणे (१८.४.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |