मुसलमान युवकांकडून हिंदु युवतीवर सामूहिक बलात्कार !
|
बरेली (उत्तरप्रदेश) – दोघा मुसलमान युवतींनी हिंदु युवतीशी मैत्री करून तिला लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढल्याची घटना येथे घडली. मुसलमान युवतींनी काही मुसलमान तरुणांना हिंदु युवतीवर बलात्कार करायला लावला. एवढेच नव्हे, तर पीडित हिंदु युवतीला डांबून ठेवून तिचे बलपूर्वक धर्मांतरही केले. या प्रकरणी २१ वर्षीय पडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अकलीम कुरेशी, शादाब, विसाल, तरन्नुम, शाहाना आणि गजाला या ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
Hindu girl gang-raped by Muslim brothers, aided by their sisters: Bareilly, UP https://t.co/EnEfo6v9JV
— HinduPost (@hindupost) November 26, 2022
पीडिता बरेली येथील तिच्या घरी ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत होती. तेथे तरन्नुम आणि गजाला या दोघींचे येणे-जाणे होते. त्या दोघींनी पीडितेशी मैत्री केली. एक दिवस त्या दोघींनी पीडितेला त्यांच्या घरी बोलावले आणि डांबून ठेवून तरन्नुम हिच्या भावाला पीडितेवर बलात्कार करायला लावला. याचे त्या दोघींनी चित्रीकरण केले. यानंतर त्यांनी हे चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देत पीडितेचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर केले, तसेच अकलीम याच्यासमवेत तिचा विवाह लावून दिला. अकलीम हा पीडितेला नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शन देऊन तिचे लैंगिक शोषण करत होता. विवाहानंतर पीडितेला अजमेर, प्रयाग, काशी, अकबरपूर आणि बिहार येथे नेण्यात आले अन् बंधक बनवण्यात आले. तेथे अकलीम याचा भाऊ विसाल आणि शादाब या नराधमांनीही पीडितेवर बलात्कार केला. यास पीडितेने विरोध केल्यावर तिला मारहाण केली. आरोपींनी पीडितेला बलपूर्वक गोमांसही खाऊ घातले. पीडितेने २३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी या नराधमांच्या कह्यातून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर तिने भीक मागून पैसे जमवले आणि आगर्याहून बरेलीला परतली. तेथे तिने आरोपींच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिकालव्ह जिहादमुळे प्रतिदिन शेकडो हिंदु मुली आणि महिला यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असतांना कुठल्याही सरकारी यंत्रणा काहीही करत नाहीत, हे लक्षात घ्या अन् हिंदु महिला आणि युवती यांच्या रक्षणार्थ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची अपरिहार्यता जाणा ! |