मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु तरुणीचे अपहरण करून बलात्कार
तक्रार केल्यास ठार मारण्याची पीडिता आणि तिचे वडील यांना धमकी
बरेली (उत्तरप्रदेश) – येथे एका हिंदु कुटुंबाच्या घरात वडिलांसमवेत टाईल्स लावण्याच्या कामासाठी गेलेल्या फरमान अली याने या घरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर त्याने या मुलीला ठार मारण्याची धमकी दिली होती.
फरमान या मुलीचा शाळेतून येता-जात पाठलाग करत होता. फरमान याने २२ नोव्हेंबरला तिचे अपहरण केले. तिला अज्ञात ठिकाणी नेऊन तिला गुंगी येण्याचा पदार्थ खायला देऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या वडिलांना याची माहिती मिळाल्यावर ते पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास जात असतांना फरहान आणि त्याचे वडील यांनी मुलीच्या वडिलांना वाटेत रोखले आणि शिवीगाळ केली. तसेच ठार मारण्याची धमकीही दिली. यानंतर मुलीच्या वडिलांनी विश्व हिंदु परिषदेचे साहाय्य घेत फरहान आणि त्याचे वडील यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. आरोपींना तात्काळ अटक होण्यासाठी येथील नागरिकांनी रस्ता बंद आंदोलनही केले.
जिस हिंदू घर में टाइल्स लगाने गया था फरमान अली, उसी घर की बच्ची को स्कूल से किया अगवा: रेप कर जान से मारने की दी धमकी#UttarPradesh https://t.co/62OIgCdSsP
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 25, 2022
संपादकीय भूमिका
|