२८ नोव्हेंबरला ‘विराट हिंदू मूक मोर्चा’द्वारे नाशिककर ‘लव्ह जिहाद’विरोधात संघटित होणार !
मोर्च्याच्या नियोजनासाठी हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीचे आयोजन
नाशिक – येत्या २८ नोव्हेंबरला ‘लव्ह जिहाद’विरोधात नाशिककर एकवटणार आहेत. सकल हिंदु समाजाच्या वतीने २८ नोव्हेंबरला विराट हिंदू मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच विराट मोर्च्याच्या नियोजनाची बैठक नाशिकमध्ये पार पडली. लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशात लागू करणे, श्रद्धा वालकर हिचा मारेकरी आफताब याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्या प्रत्येक व्यक्ती, संघटना किंवा राजकीय पक्ष यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी येथे मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. २८ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता येथील बी.डी. भालेराव मैदान येथून मोर्च्याला आरंभ होईल. मोर्च्याच्या नियोजन बैठकीला मोठ्या प्रमाणावर हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हेही उपस्थित होते. त्यांनी राज्यात ‘लव्ह जिहाद’ची वाढती प्रकरणे, त्यासाठी होणारा अर्थपुरवठा आणि आतंकवादी कारवाया यांचा संबंध याविषयी मार्गदर्शन केले. महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी ‘हिंदु समाजाला शस्त्र आणि शास्त्र यांची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले.
महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांचे आवाहन !
‘सर्व हिंदु बंधू-भगिनींनी मोर्च्यात मोठ्या संख्येत सहभागी व्हावे. हीच योग्य वेळ आहे एकत्र येण्याची. अभी नहीं, तो कभी नहीं । हर हर महादेव’, असे महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी सांगितले.