सोलापूर येथे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शाईफेक !
सोलापूर – एस्.टी. कामगारांचे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पत्रकार परिषदेमध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी शाई फेकली. या वेळी घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला. सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेडकडून संताप व्यक्त करत सदावर्ते महाराष्ट्राचे तुकडे करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या वेळी गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ‘‘आज भारतीय संविधानदिन आहे. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या कार्यकर्त्यांना माझ्या संवाद यात्रेने सळो कि पळो केले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.’’