मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणातील शौर्याचा इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये घ्यावा !
‘पोलीस मित्र’ संघटनेची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी
पुणे – मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सैनिक यांनी मोठा लढा दिला. स्वत:च्या प्राणांचे बलीदान दिले. त्यांच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी शालेय पाठ्यपुस्तकामध्ये या शौर्याचा समावेश करावा, अशी मागणी ‘पोलीस मित्र’ संघटनेच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
‘पोलीस मित्र’ संघटनेच्या वतीने येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकामध्ये मुंबईतील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणात शहीद झालेल्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, संदीप खर्डेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.