गोतस्करी वाढल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करू !
अमरावती गोरक्षण संस्था अंतर्गत ‘पशूधन बचाओ समिती’ची चेतावणी !
अमरावती, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – गेल्या काही मासांपासून अमरावती जिल्ह्यात गोतस्करी आणि कत्तल वाढली आहे; मात्र यावर अपेक्षित कारवाई केली जात नाही. यामुळे हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या गोमातेचे रक्षण करावे आणि प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. गोतस्करी अशीच वाढत गेली, तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, अशी चेतावणी अमरावती गोरक्षण संस्था अंतर्गत ‘पशूधन बचाओ समिती’ यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी समितीचे श्री. महेश देवळे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. विजय शर्मा, श्री. मोहन महाराज, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे आणि अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकागोतस्करी वाढण्याला पोलिसांची निष्क्रीयताच कारणीभूत आहे ! प्रत्येक वेळी जनतेला चेतावणी देऊन आंदोलन करावे लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! |