झाडांसाठी घरगुती संवर्धक (टॉनिक)
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘नारळातील पाणी (शहाळ्याचे नाही) हे झाडांसाठी उत्तम संवर्धक (टॉनिक) म्हणून कार्य करते. २ लिटर पाण्यामध्ये २० मि.लि. गाळलेले नारळपाणी मिसळावे. तुषाराच्या (स्प्रेच्या) बाटलीमध्ये हे मिश्रण घालून झाडांवर तुषारसिंचन (फवारणी) करावे. झाडाला मोहोर येऊ लागल्यानंतर, फळे धरणे चालू झाल्यावर, तसेच फळांची वाढ होत असतांना अशा निरनिराळ्या अवस्थांमध्ये हे तुषारसिंचन लाभदायक ठरते.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (११.११.२०२२)