प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती
विपुल धनसंपत्ती असलेली वैदिक संस्कृती !
आर्य चाणक्यांचे अर्थशास्त्र एकदा नजरेखालून घाला. चक्रवर्ती समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त या सम्राटांच्या काळात वैदिक संस्कृती गौरीशंकरासारखी तळपत होती. ते ‘सुवर्णाचे युग’ म्हणून प्रसिद्ध होते. वाङ्मय, सभ्यता, कला, विज्ञान, उद्योग, व्यापार सगळे कसे कळसाचे होते. तो उत्तरेचा सम्राट हर्षवर्धन ५ वर्षांतून एकदा सर्व धनाचे दान करून गंगातीरावर रहायचा आणि पुन्हा राज्यसंपदा संपादन करायचा.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामी
(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०१८)