मुसलमानाच्या हत्येमुळे संतापलेल्या कुटुबियांची रुग्णालयात तोडफोड
जमावबंदी आदेश लागू
भीलवाडा (राजस्थान) – येथे इब्राहिम पठाण (वय ३४ वर्षे) नावाच्या व्यक्तीच्या हत्येमुळे संतापलेल्या त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयात तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी शहरात जमावबंदी आदेश लागू करून ४८ घंट्यांसाठी इंटरनेट सेवा खंडित केली. या प्रकरणी पोलिसांनी काली तापडिया याच्यासह दोघा जणांना कह्यात घेतले आहे. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बडला चौक येथे इब्राहिम पठाण आणि त्याचा भाऊ टोनी पठाण (वय २२ वर्षे) उभे होते. तेव्हा आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात इब्राहिम याचा मृत्यू झाला, तर टोनी गंभीररित्या घायाळ झाला. या घटनेनंतर आक्रमणकर्ते पसार झाले. रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू असतांना त्याच्या कुटुंबियांनी तोडफोड केली.
भावाच्या हत्येचा उगवला सूड ?
१० मे २०२२ या दिवशी भीलवाडा येथे आदर्श तापडिया याची हत्या करण्यात आली होती. आदर्श तापडिया हा काली तापडिया याचा भाऊ होता. इब्राहिमचा संबंध या हत्याकांडाशी असल्याचे सांगितले जात आहे. त्यातूनही ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
संपादकीय भूमिका
|