इस्रोने अवकाशात पाठवले ९ उपग्रह !
श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) येथील सतीश धवन उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून दुपारी १२ च्या सुमारास ‘पी.एस्.एल्.व्ही. (पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल)-सी ५४’ या योजनेच्या अंतर्गत ९ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. यामध्ये ‘ओशनसॅट-३’ या उपग्रहाचा समावेश आहे. हा उपग्रह महासागराच्या परिसराचा अभ्यास करणार आहे.
सौजन्य : Dainik Jagran – दैनिक जागरण