मिरज (जि. सांगली) : धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित असलेली ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !
मिरज येथे हलाल सक्तीविरोधी कृती समितीचे प्रांत कार्यालयात निवेदन
मिरज, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्या सर्व संस्थांचे अन्वेषण करावे, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती मिरज’च्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांना देण्यात आले.
या प्रसंगी भाजप सांस्कृतिक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री सुखदेव कोरे, चैतन्य तांबोळकर, विनायक कुलकर्णी, शिवसेनेचे पंडित(तात्या) कराडे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री संभाजी कोरे, एकनाथ पोरे, विठ्ठल मुगळखोड, आंबालाल ओसवाल, अरुण सहस्रबुद्धे, दत्तभक्त श्री. चंद्रशेखर कोडोलीकर, हलाल सक्तीविरोधी कृती समिती मिरजचे श्री. गिरीष पुजारी यांसह अन्य उपस्थित होते.